नांदेड जिल्ह्यातील वजिराबाद,उमरी,शिवाजीनगर,नांदेड ग्रामीण,माहुर पोलीस स्टेशन अंतर्गत दरोड्याचा प्रयत्न,घरफोडी,मेडिकल दुकानाचे शटर वाकवून चोरी,गंभीर दुखापत,विवाहीतेचा छळ,मपोकॉ चा आजाराने आकस्मात मृत्यू इत्यादी ८ गुन्हे दाखल
![]() |
| महाराष्ट्र पोलीस |
जा.क्रं. 326 / 2023 दिनांक 24.08.2023
पोलीस अधिक्षक कार्यालय, नांदेड
1) दरोडयाचा प्रयत्न :-
वजिराबाद :- दिनांक 22.082023 रोजी 23.10 वा. चे सुमारास, खडकपुरा पाण्याचे टाकीच्या पाठीमागील सिमेंट रोडवर नांदेड येथे यातील नमुद मऊ आरोपीतांनी संगणमत करून आपले साव्यात वाहन व घातक शस्त्र, नॉयलॉनच्या दोरीचे तुकडे दरोडा टाकण्याच्या साहित्यासह अ. क्र. 1 ते 6 मिळुन आले व अ. क्र. 79. अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेले. वगैरे फिर्यादी सपोनि / शिवराज गंगाराम जमदाडे, ने पोस्टे वजिराबाद यांचे फिर्यादवरून पोस्टे वजिराबाद गुरन 360 / 2023 कलम 399, 402, 34 भादवि कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास चालू आहे.
2) घरफोडी :-
उमरी :- दिनांक 26.07.2023 रोजी चे 12.00 से 02:00 वा. चे दरम्यान, किराणा दुकानांमध्ये मौ. गोळेगाव ता. उमरी जि. नांदेड येथे, यातील कोणीतरी अज्ञात आरोपीने किराणा दुकानाचे लॉक तोडुन आत प्रवेश करून किराणा दुकानातील सारण, सिगारेट, साखर पावडर, इत्यादी किरकोळ सामान अंदाजे सात हजार रूपयाचे व दुकानां मधील गल्यातील नगदी सहा हजार रूपये असे एकुण 13,000/- रूपयाचा माल चोरून नेला. वगैरे फिर्यादी साईनाथ पोपटटी मोगले, व्यवसाय शेती रा. गोळेगाव ता. उमरी जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरून पोस्टे उमरी गुरनं. 236 / 2023 कलम 457, 380 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास चालू आहे.
3) मेडीकल दुकानाचे शटर वाकवुन चोरी :-
1) शिवाजीनगर :- दिनांक 21.08.2023 रोजी चे 21.00 ते दि. 22.08.2023 चे 06.00 वा. चे दरम्यान, वसंतनगर नांदेड येथे, यातील कोणीतरी अज्ञात आरोपीने फिर्यादीचे मेडीकल दुकानाचे लोखंडी शटर वाकवून आत मधुन चिल्लर 5000/- रूपये व एक पेनड्राईव्ह चोरून नेला. वगैरे फिर्यादी माधव गजानन आबादार, वय 29 वर्षे, व्यवसाय व्यापार रा. तरोडा (बु) नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे शिवाजीनगर गुरन 282 / 2023 कलम 461, भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास चालू आहे.
4) गंभीर दुखापत :-
नांदेड ग्रामीण :- दिनांक 22.08.2023 रोजी चे 17.00 वा. चे सुमारास, सरपंच धाबा लातुर फाटा नांदेड येथे, यातील नमुद चार आरोपीतांनी संगणमत करून फिर्यादी हा त्याच्या मित्रासोबत सरपंच धाबा येथे जेवण करण्यासाठी गेले असता जुन्या भांडणाचे कारणावरून फिर्यादीस शिवीगाळ करून हातातील लोखंडी रॉडने फिर्यादीचे डोक्यात, मानेवर, पाठीत, कमरेस व दोन्ही पायास मारल्याने उजवा पाय फॅक्टर केला व विटकरीने मानेवर मुक्का मार दिला व जिवे मारण्याची धमकी दिली. वगैरे फिर्यादी राजु नागोराव वाघमारे, वय 37 वर्षे व्यवसाय मजुरी रा. फत्तेपुर ता. जि. नांदेड यांचे फिर्यादवरून पोस्टे नांदेड ग्रामीण गुरन 619 / 2023 कलम 325, 504, 506, 34 भादवि कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास चालू आहे.
5) विवाहीतेचा छळ :-
1) नांदेड ग्रामीण :- दिनांक 30.12.2011 चे 10.00 ते दि. 23.08.2020 चे 10.00 वा. चे दरम्यान, मिलतनगर नांदेड येथे यातील नमुद सहा आरोपीतांनी संगणमत करून फिर्यादी बाईस तुझे माहेरहुन एक लाख रूपये घेवुन ये म्हणुन सतत काम लावुन उपाशी पोटी ठेवुन वारंवार मारहाण करून तिचा शारिरीक व माणसीक छळ केला. जिवे मारण्याची धमकी दिली. वगैरे फिर्यादी 33 वर्षीय महिला यांनी दिलेल्या फिर्यादवरून पोस्टे नांदेड ग्रामीण गुरनं 616 / 2023 कलम 498 (अ). 323, 504, 506, 34 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास चालू आहे.
2) उमरी :- दिनांक 21.08.2023 रोजी चे 21.30 या. चे सुमारास, रविनगर देविदास मंगल कार्यालय जवळ उमरी ता. उमरी जि. नांदेड येथे यातील नमुद चार आरोपीतांनी संगणमत करून फिर्यादी बाईस लग्नात आणलेले भांडे पोत्यात का भरून ठेवलीस व माहेरहून सोन्याची साखळी का आणली नाही म्हणून फिर्यादीस लाथा बुकयांनी मारहाण करून शिवीगाळ करून शारिरीक व माणसीक छळ केला. व जिवे मारण्याची धमकी दिली. वगैरे फिर्यादी 34 वर्षीय महिला यांनी दिलेल्या फिर्यादवरून पोस्टे उमरी गुरनं 237 / 2023 कलम 498 (31), 323, 504, 506, 34 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास चालू आहे.
3) माहुर :- दिनांक 27.05.2016 ते दिनांक 23.08.2023 चे 11.00 वा. चे दरम्यान, फिर्यादीचे सासरी मौ. आष्टा तांडा ता. माहुर जि. नांदेड येथे, यातील नमुद चार आरोपीतांनी संगणमत करून फिर्यादी बाईस तीचे चारीत्र्यावर संशय घेवुन तुझे माहेरहून मोटार सायकल घेण्यासाठी 50,000/- रूपये का घेवुन येत नाहीस म्हणुन शिवीगाळ व मारहाण करून शारिरीक व माणसीक छळ केला. व जिवे मारण्याची धमकी दिली. वगैरे फिर्यादी 28 वर्षीय महिला यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे माहुर गुरनं 90 / 2023 कलम 498 (31), 323, 504, 506, 34 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास चालू आहे.
6) आजाराने मृत्यु :-
वजिराबाद :- दिनांक 22.08.2023 रोजी 23.22 वा. चे सुमारास, लोटस हॉस्पीटल नांदेड येथे, यातील मयत नामे मपोकॉ / 270 अनुसया पि. हरिश्चंद्र केंद्रे, वय 34 वर्षे, रा. चोंडी ता. लोहा जि. नांदेड, हिस किडणी, लिव्हर, हृदयाचे व सांधेवात वगैरे आजार झाल्याने लोटस हॉस्पीटल नांदेड येथे अॅडमीट केले असता उपचार चालु असतांना मरण पावली. तिने पोस्टे इतवारा, भाग्यनगर, विमानतळ, शिवाजीनगर येथे कर्तव्य बजावले आहे. वगैरे खबर देणार गोविंद हरिश्चंद्र केंद्रे, वय 36 वर्षे, व्यवसाय शेती रा. चोंडी ता. लोहा जि. नांदेड यांनी दिलेल्या खबरीवरुन पोस्टे वजिरबाद आ. मृ. 65 / 2023 कलम 174 सीआरपीसी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
जनसंपर्क अधिकारी
पोलीस अधिक्षक कार्यालय,नांदेड

Comments
Post a Comment