नांदेड जिल्ह्यातील विमानतळ, मुदखेड,देगलूर,अर्धापुर,बारड, शिवाजीनगर,हदगाव पोलीस स्टेशन अंतर्गत घरफोडी,गंभीर दुखापत, शासकीय कामात अडथळा,विवाहितेचा छळ,अपघात,जुगार ,प्रोव्हिबीशन इत्यादी आठ गुन्हे दाखल

 


प्रेसनोट

पोलीस अधिक्षक कार्यालय, नांदेड जा.क्रं.323/2023 दिनांक 21.08.2023

1) घरफोडी :-

विमानतळ :- दिनांक 19.08.2023 रोजी चे 16.00 ते 18.30 वा. चे दरम्यान, फिर्यादीचे राहाते घरी स्वातंत्र सैनिक कॉलनी नांदेड येथे यातील फिर्यादीचे घराचे दाराची कडी तोडुन आत प्रवेश करून घरातील कपाटाची चावीने कपाट उघडुन लॉकरमधील रोख रक्कम 75,000/- रूपये कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेले आहे. वगैरे फिर्यादी प्रल्हाद दत्तराव तवर, वय 68 वर्षे, व्यवसाय सेवानिवृत रा. स्वातंत्र्य सैनिक कॉलनी नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोस्टे विमानतळ गुरनं. 290 / 2023 कलम 457, 380 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास पोहेकॉ / धुळगुंडे हे करीत आहेत.

2) गंभीर दुखापत :-

मुदखेड :- दिनांक 19.08.2023 रोजी चे 19.00 वा. चे सुमारास, नवी आबादी मुदखेड समद किराणा दुकाना समोर नांदेड येथे यातील नमुद दोन आरोपीतानी संगणमत करून शिवीगाळ करीत असतांना फिर्यादीने तुम्ही माझे मुलास शिवीगाळ का करता असे म्हणल्याने थापडा बुक्कयाने व विटाने मारून डोके फोडले व मुलाचे दातास जखम होऊन दात खुडला आहे. वगैरे फिर्यादी शेख मुनिसा शेख हकीम, वय 40 वर्षे, व्यवसाय मजुरी रा. नवी आबादी मुदखेड ता. मुदखेड जि. नांदेड यांचे फिर्यादवरून पोस्टे मुदखेड गुरन 175 / 2023 कलम 325, 324, 323, 504, 506, 34 भादवि कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास सपोउपनि / श्री गिते हे करीत आहेत.

3) शासकीय कामात अडथळा :-

देगलुर :- दिनांक 20.08.2023 रोजी 05.30 वा. सुमारास, लेंडी नदीपुल ते बागन टाकळी दरम्यान रोडवर ता. देगलुर जि. नांदेड येथे, यातील नमुद आरोपीने बिना नंबरच्या ट्रॅक्टर किंमती 5,00,000/- रू च्या मध्ये दोन ब्रास लाल रेती किमती 8,000/-रूपयाची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतुक करीत असताना मिळुन आला. व फिर्यादी करीत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला. वगैरे फिर्यादी राजेश हानमंतराव गायकवाड, वय 32 वर्षे, व्यवसाय नौकरी तलाठी सज्जा हनुमान हिपरगा ह. मु. बापुनगर ता. देगलुर जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरून पोस्टे देगलुर गुरनं 385 / 2023 कलम 353, 379, 34, भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास पोउपनि / श्री मुंडे हे करीत आहेत.

4) विवाहीतेचा छळ :-

विमानतळ :- दिनांक 25.10.2021 से 13.00 ते दि. 12.07.2023 चे 10.00 वा. चे दरम्यान, फिर्यादीचे सासरी मौ. गोरठा ता. उमरी ह. मु. बजरंग कॉलनी नांदेड येथे यातील नमुद तीन आरोपीतांनी संगणमत करून तुला शेतीचे व घरातील काम निट करता येत नाही म्हणुन वेल्डींगचे दुकान टाकण्यासाठी तुझे माहेरहून एक लाख रुपये घेवुन ये म्हणुन शिवीगाळ व मारहाण करून उपाशी पोटी ठेवुन शारिरीक व माणसीक छळ केला. व जिवे मारण्याची धमकी दिली. वगैरे फिर्यादी 23 वर्षीय महिला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोस्टे विमानतळ गुरनं 289 / 2023 कलम 498 (अ), 323, 504, 506. 34 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास पोहेकॉ / लोणे हे करीत आहेत.

5) अपघात :-

अर्धापुर :- दि. 19.08.2023 रोजी चे 20.30 वा. चे सुमारास, नांदेड ते अर्धापुर जाणारे रोडवर जांभरून पाटीसमोर ता. अर्धापुर जि. नांदेड येथे, यातील मयत नामे 1) शहाबाद खान युसूफ खान, वय 32 वर्षे 2 युनूस खान युसूफ खान, वय 28 दोघे रा. खडकपुरा नांदेड हे दोघे अॅक्टीव्हा गाडी क्रमांक एमएच-26 / एपी-8840 नांदेड येथुन अर्धापुरकडे जेवणासाठी जात असतांना पाठीमागुन काळया रंगाची स्कॉर्पीओ क्रमांक एमएच-38 / डब्ल्यु - 2277 च्या चालकांनी आपले वाहन भरधाव वेगात हयगय व निष्काळजीपणाणे चालवुन पाठीमागुन जोराची धडक देवून गंभीर जखमी करून त्याचे मरणास कारणीभूत झाला. वगैरे फिर्यादी मोहसीन खान पि माजिद खान, वय 29 वर्षे, व्यवसाय मजुरी रा. जुना खडकपुरा नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे अर्धापुर गुरनं. 308 / 2023 कलम 279, 304 (अ) भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास सपोनि / श्री मस्के हे करीत आहेत.

6) जुगार :-

बारड :- दिनांक 20.08.2023 रोजी थे 18.35 था. चे सुमारास भोजराज दत्ता पवार रा. निवघा ता. मुदखेड यांचे निवधा गावाचे शिवारातील इजळी रोड लगत शेताचे घुन्यावरील लिंबाचे झाडाखाली मौ. निवधा ता. मुदखेड जि. नांदेड येथे, यातील नमुद पाच आरोपीतांनी बिना परवाना बेकायदेशिररित्या पत्यावर पैसे लावुन झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळत खेळवित असताना नगदी 2800 /- रुपये व जुगाराचे साहित्यासह मिळुन आले. वगेरे फिर्यादी पोउपनि / श्री सुभाष ग्यानबाजी वानोले ने पोस्टे बारड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोस्टे बारड गुरनं 63/ 2023 कलम 12 (अ) म. जु. कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास पोहेकॉ / राठोड हे करीत आहेत.

7) प्रोव्हिबीशन :-

1) शिवाजीनगर :- दिनांक 20.08.2023 रोजी घे 12.10 वा. चे सुमारास श्रावस्तीनगर ते राजनगर रोडवर दोस्ताना पानपटी मध्ये नांदेड येथे यातील नमुद आरोपीने बिना परवाना बेकायदेशिररित्या देशी/विदेशी दारू किंमती 5115/- रुपयाचा मुद्येमाल चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने ताब्यात बाळगलेला मिळुन आला. वगैरे फिर्यादी पोउपनि / श्री गोविंद संभाजी मुंडे ने स्थागुशा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोस्टे शिवाजीनगर गुरनं 278 / 2023 कलम 65 (ई). न. प्रा. कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास पोहेकॉ / मठदेवरू हे करीत आहेत..

2 ) हदगांव :- दिनांक 19.09.2023 रोजी चे 23.00 वा. चे सुमारास, महादेव मंदीरा जवळ मौ. तळणी ता. हदगाव जि. नांदेड येथे यातील नमुद दोन आरोपीतानी बिना परवाना बेकायदेशिररित्या देशी दारू भिंगरी सत्रा किंमती 1540/- रुपयाचा मुद्देमाल चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने ताब्यात बाळगलेला मिळुन आला. वगैरे फिर्यादी पोकों / 3161 दयानंद महादेव वाडकर ने पोस्टे हदगांव यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे हदगांव गुरनं 132 / 2023 कलम 65 (ई). म. प्रो. कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास सपोनि / श्री मांटे हे करीत आहेत.

जनसंपर्क अधिकारी

पोलीस अधिक्षक कार्यालय, नांदेड

Comments

Popular posts from this blog

नांदेड जिल्ह्यातील किनवट,सोनखेड,नायगाव,हदगाव,भोकर,नांदेड ग्रामीण,देगलूर,अर्धापुर,उमरी पोलीस स्टेशन अंतर्गत जबरी चोरी,जनावर चोरी, गंभीर दुखापत,विवाहीतेचा छळ,आत्महत्येस प्रवृत्त केले,जुगार,प्रोव्हिबीशन,भारतीय हत्यार कायदा,नवीन पुलावरून गोदावरी पात्रात उडी मारुन आत्महत्या,गळफास घेऊन आत्महत्या इत्यादी १६ गुन्हे दाखल