नांदेड जिल्ह्यातील किनवट,सोनखेड,नायगाव,हदगाव,भोकर,नांदेड ग्रामीण,देगलूर,अर्धापुर,उमरी पोलीस स्टेशन अंतर्गत जबरी चोरी,जनावर चोरी, गंभीर दुखापत,विवाहीतेचा छळ,आत्महत्येस प्रवृत्त केले,जुगार,प्रोव्हिबीशन,भारतीय हत्यार कायदा,नवीन पुलावरून गोदावरी पात्रात उडी मारुन आत्महत्या,गळफास घेऊन आत्महत्या इत्यादी १६ गुन्हे दाखल

 
पोलीस अधिक्षक कार्यालय नांदेड 

प्रेसनोट
जा.क्रं. 325 / 2023
दिनांक : 23.08.2023
पोलीस अधिक्षक कार्यालय, नांदेड

1) जबरी चोरी :-

किनवट :- दिनांक 21.08.2023 रोजी 19.30 वा. चे सुमारास, सोपान केंद्रे यांचे फॉर्म हाऊसच्या पाठीमागे मंगबोटी रोडवर गोकुंदा ता. किनवट जि. नांदेड येथे यातील फिर्यादी व त्याचे साक्षीदार मित्र हे फिर्यादीच्या घराचे बांधकाम बघण्यासाठी गंगाबोडी रोड गोकुंदा येथे मोटार सायकलवर जात असताना यातील दोन मोटार सायकल वरील आरोपीतांनी संगणमत करून मोटार सायकल आडवी लावुन फिर्यादी व मित्राच्या खिशातील नगदी 5000 /- रूपये व दोन मोबाईल किंमती 15,000 /- रू असा एकुण 20,000 /- रूपयाचा माल जबरीने चोरून घेतले व तुम्हाला बंदुक काढुन दाखवु का अशी धमकी दिली. वगैरे फिर्यादी चंद्रशेख विठ्ठलराव शेंडे, वय 44 वर्षे व्यवसाय शिक्षक रा. समतानगर किनवट ता. किनवट जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे किनवट गुरनं 206 / 2023 कलम 392, 341, 506, 34 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

2) जनावर चोरी :-

1) सोनखेड :- दिनांक 19.08.2023 रोजी रात्री 21.00 वा. ते दिनांक 20.08.2023 रोजी चे 06.00 वा. चे दरम्यान, मौजे मडकी ता. लोहा जि. नांदेड येथे यातील फिर्यादीची गांय किंमती 40,000/- रूपयाची आखाडयावर बांधली असतांना कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. वगैरे फिर्यादी गोविंद पी हरीराम मोरे, वय 35 वर्षे व्यवसाय शेती रा. मडकी ता. लोहा जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोस्टे सोनखेड गुरनं 111 / 2023 कलम 379 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

2 ) नायगांव :- दिनांक 20.08.2023 रोजी 18.30 वा. ते दिनांक 21.08.2023 रोजी चे 05.00 वा. चे दरम्यान, गोदमगाव शिवारात कोलंबी जाणारे रोडवर ता. नायगांव जि. नांदेड येथे यातील फिर्यादीची आडीच वर्षाची कालवड किमती 8,000/- रूपयाची आखाडयावर बांधली असतांना कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली. वगैरे फिर्यादी गोविंद विठ्ठल पांचाळ, वय 55 वर्षे, व्यवसाय शेती रा. गोदमगाव ता. नायगांव जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे नायगांव गुरनं 126 / 2023 कलम 379 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

3) गंभीर दुखापत :-

1 ) हदगांव :- दिनांक 20.08.2023 रोजी चे रात्री 19.30 वा. चे सुमारास, फिर्यादीचे घरासमोर मौ. काळेश्वर ता. हदगांव जि. नांदेड येथे यातील नमुद चार आरोपीतांनी संगणमत करून आमच्या भाचीची बदनामी का करता म्हणुन फिर्यादीस आरोपीतांनी कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात मारून जबर दुखापत केली. थापड बुक्यानी सुध्दा मारहाण करून काठीने मारहाण केली आहे. वगैरे फिर्यादी अश्विनी भ्र. भानुदास जाधव, वय 46 वर्षे, व्यवसाय घरकाम ता. हदगाव जि. नांदेड यांचे फिर्यादवरुन पोस्टे हदगांव गुरन 193/ 2023 कलम 326, 323, 507, 506, 34 भादवि कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

2) भोकर :- दिनांक 21.08.2023 रोजी चे सायंकाळी 05.30 वा. चे सुमारास, संत सेवालाल महाराज मंडप पाकीतांडा ता. मोकर जि. नांदेड येथे, यातील फिर्यादी हा तांडयातील संत सेवालाल महाराज मंडपात बोलत असतांना यातील नमुद दोन आरोपीतांनी संगणमत करून फिर्यादीस खेळण्यासाठी पैसे मागीतले असता त्यानी पैसे नाहीत असे सांगीतल्याने आरोपीने तोंडावर बुकी मारून दात पाडुन व कडयाने डोकयात मारून गंभीर दुखापत केली. शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. वगैरे फिर्यादी प्रवीण बळीराम जाधव, वय 35 वर्षे व्यवसाय शेती रा. पाकीतांडा ता. भोकर जि. नांदेड यांचे फिर्यादवरून पोस्टे भोकर गुरन 302 / 2023 कलम 325, 324, 323, 507, 504, 506, 34 भादवि कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

4) विवाहीतेचा छळ :-

1) नांदेड ग्रामीण :- दिनांक 05.08.2020 ते दि. 05.10.2022 चे दरम्यान, मौ. सिंदगी ता. जळकोट जि. लातुर ह. मु अशोकनगर गोपाळचावडी ता. जि. नांदेड येथे, यातील नमुद सात आरोपीतांनी संगणमत करून फिर्यादी बाईस मो सा घेण्यासाठी 80,000/- रुपये घेवुन ये म्हणुन सतत शारिरीक व मानसिक छळ करून पतीने शिवीगाळ करून लाथाबुक्याने मारहाण केली. तु पैस नाही आणलीस तर तुला खतम करतो म्हणुन जिवे मारण्याची धमकी दिली. वगैरे फिर्यादी 26 वर्षीय महिला यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे नांदेड ग्रामीण गुरनं 614 / 2023 कलम 498 (अ), 323, 504, 506, 34 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

2) किनवट :- दिनांक 01.02.2021 रोजी चे 10.00 ते दि. 08.08.2023 से 10.00 वा. चे दरम्यान, फिर्यादीच्या सासरी सोनु किराणा आजम कॉलनी हिंगोली जि. हिंगोली. ह. मु. हबीब कॉलनी गोकुंदा ता. किनवट जि. नांदेड येथे, यातील नमुद पाच आरोपीतांनी संगणमत करून तु दुकान टाकण्यासाठी पाच लाख रूपये तुझे आई व वडीलांकडुन घेवुन ये म्हणुन शिवीगाळ व मारहाण करून तु काळी आहेस, आम्हाला पसंत नाहीस, तु दुबळी आहेस, तुला आम्ही फारकत देता अशी धमकी देत तीचा शारिरीक व मानसिक छळ करून घरातुन हाकलून दिले. वगैरे फिर्यादी 21 वर्षीय महिला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोस्टे किनवट गुरनं 204 / 2023 कलम 498 (अ), 323, 504, 506, 34 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

5) आत्महत्येस प्रवृत्त केले :-

भोकर :- दिनांक 16.082023 रोजी रात्री 07.00 वा. चे सुमारास मयताचे राहाते घरी मौ दिवशी खुर्द तांडा ता. भोकर जि. नांदेड येथे. यातील फिर्यादीचे मुलगी मयत नामे प्रेमलाबाई पंडीत रोठोड, वय 45 वर्षे, रा. दिवशी खुर्द तांडा भोकर ता. भोकर जि. नांदेड हीस तिचा नवरा हा मागील पाच वर्षापासुन दारू पिऊन मारहाण करून माहेरहून 50000/- रुपये घेऊन ये म्हणुन त्रास देऊन शेती विकल्याने त्याच्या त्रासाला कंटाळुन कोणतेतरी विषारी औषध पिल्यामुळे तीस उपचारा करीता स द विष्णुपूरी नांदेड येथे दाखल केले असता उपचारा दरम्यान दिनांक 21.08.2023 राजी सकाळी 11.00 मरण पावली. यातील नमुद आरोपीने आत्महत्येस प्रवृत्त केले. वगैरे फिर्यादी शिवलाल भीमसींग आहे. वय 65 वर्षे व्यवसाय शेतीकाम रा. कासारपेठ भोकर ता. मोकर जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोस्टे भोकर गुरन 301 / 2023 कलम 306, 498 (31), 323, 34 भादवि कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

6) जुगार :-

1) देगलुर :- दिनांक 22.08.2023 रोजी चे 18.20 वा. चे सुमारास, देगलुर कॉलेज समोर संघर्षनगर येथे रोडलगत एका लिंबाच्या झाडाखाली ता. देगलुर जि. नांदेड येथे, यातील नमुद पाच आरोपीतांनी व पळुन गेल्या आठ आरोपीतांनी मिळुन बिना परवाना बेकायदेशिररित्या तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवित असतांना नगदी व साहित्य 4.42,380/- रुपयाचे मुद्येमलास मिळुन आले. वगैरे फिर्यादी सपोउपनि / श्री राजाराम चांदराव मिरदोड, ने पोस्टे देगलुर यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे देगलुर गुरनं 389 / 2023 कलम 12 (अ) म. जु. कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

2) अर्धापुर :- दिनांक 22.08.2023 रोजी चे 15.30 वा. चे सुमारास फिर्यादीचे भावाचे शेतात मेंढला शिवार ता. अर्धापुर जि. नांदेड येथे यातील नमुद सात आरोपीतांनी बिना परवाना बेकायदेशिररीत्या अंदर बाहर नावाचा जुगार खेळत य खेळवित असतांना नगदी व साहित्य 6,640 /- रुपयाचे मुधेमलास मिळुन आले. वगैरे फिर्यादी सपोउपनि / श्री दिपक साहेबराव मस्के, ने पोस्टे अर्धापुर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोस्टे अर्धापुर गुरनं 315 / 2023 कलम 12 (अ) म जु. कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

7) प्रोव्हिबीशन :-

1) किनवट :- दिनांक 22.08.2023 रोजी चे 17.40 वा. चे सुमारास आरोपीच्या घराच्या अंगणात कनकवाडी ता. किनवट जि. नांदेड येथे यातील नमुद आरोपीने बिना परवाना बेकायदेशिररित्या देशी दारू भिंगरी संत्रा किंमती 1400/- रुपयाचा मुद्देमाल चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने ताब्यात बाळगलेला मिळुन आला. वगैरे फिर्यादी पोना / श्री संग्राम रामकिशन मुंडे ने किनवट यांनी दिलेल्या फिर्यादवरून पोस्टे किनवट गुरनं 205 / 2023 कलम 65 (ई). म. प्रो. कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

2) भोकर :- दिनांक 22.08.2023 रोजी चे 13.45 वा. चे सुमारास, भोकर ते राहाटी रोडवर सावरगाव फाटा ता. नोकर जि. नांदेड येथे, यातील नमुद आरोपीने बिना परवाना बेकायदेशिररित्या देशी दारू भिंगरी संत्रा किमती 2800 /- रुपयाचा मुद्देमाल चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने ताब्यात बाळगलेला मिळुन आला. वगैरे फिर्यादी पोहेकॉ / 2243 मधुकर मारोती टोनगे ने पोस्टे भोकर यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे भोकर गुरनं 303 / 2023 कलम 65 (ई). म. प्रो. कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

3) उमरी :- दिनांक 22.08.2023 रोजी चे 12.00 वा. चे सुमारास, तळेगाव येथील देशमुख यांच्या वाडयाजवळ लिंबाचे झाडाखाली तळेगाव ता. उमरी जि.नांदेड येथे, यातील नमुद दोन आरोपीतांनी बिना परवाना बेकायदेशिररित्या देशी दारू भिंगरी संत्रा किंमती 3360/- रुपयाचा मुद्देमाल एक होंडा कंपणीची मो सा एमएच-26 / एबी-1585 किंमती 43,360 /- चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने वाहतुक करीत असतांना 46.720/- रूपयाचे मालासह ताब्यात बाळगलेले मिळुन आले. वगैरे फिर्यादी सपोनि / श्री रविंद्र राजेंद्र करे ने पोस्टे उमरी यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे उमरी गुरनं 234 / 2023 कलम 65 (ई) 83 में प्रो. कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

8) भारतीय हत्यार कायदा :-

1) देगलुर :- दिनांक 22.08.2023 रोजी 17.40 वा. चे सुमारास, होटटलबेस गल्ली देगलुर ता. देगलुर जि. नांदेड येथे, यातील नमुद आरोपीने बिना परवाना बेकादेशीररीत्या आपले तान्यातील एक लोखंडी धारदार खंजर बाळगलेला मिळुन आला. वगैरे फिर्यादी पोना / कृष्णा गंगाराम तलवारे ने पोस्टे देगलुर यानी दिलेल्या फिर्यादवरून पोस्टे देगलुर गुर 388/2023 कलम 4/25, भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

8) नवीन पुलावरून गोदावरी नदीपात्रात उडी मारून आत्महत्या :-

1) नांदेड ग्रामीण :- दिनांक 21.08.2023 रोजी चे 18.00 वा. चे पुर्वी, जुना मोंढा नवीने पुलाचे खाली गोदावरी नदी पात्रात नांदेड येथे, यातील मयत नामे जयशिला भ्र. भगवान लोखंडे, वय 49 वर्षे, व्यवसाय घरकाम रा. जानापुरी ता. लोहा जि. नांदेड, ही नवीन पुलावरून गोदावरी नदीपात्रात उडी मारून पाण्यात बुडून मरण पावली वगैरे खबर देणार कुलदिपक ब्रम्हाजी गच्चे, वय 51 वर्षे, व्यवसाय नौकरी रा. देगावचाळ नांदेड यांनी दिलेल्या खबरीवरुन पोस्टे नांदेड ग्रामीण आ. मू. 108 / 2023 कलम 174 सीआरपीसी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

9) गळफास घेवुन आत्महत्या :-

नांदेड ग्रामीण :- दिनांक 22.08.2023 रोजी चे 14.00 से 15.00 वा. चे दरम्यान, बोंढार तर्फे हवेली ता. जि. नांदेड येथे, यातील मयत नामे सुरेश शामराव तिडके, वय 45 वर्षे, व्यवसाय शेती रा. बोंढार तर्फे हवेली ता. जि. नांदेड यानी घेतलेल्या कर्जाचे तणावातून कंटाळुन घराच्या दुसऱ्या मजल्याच्या छताच्या लोखंडी हुकास उपरण्याने गळफास घेवुन आत्महत्या केला. वगैरे खबर देणार विजय सुरेश तिडके, वय 22 वर्षे, व्यवसाय शेती रा. बोंढार तर्फे हवेली ता. जि. नांदेड यांनी दिलेल्या खबरीवरुन पोस्टे नांदेड ग्रामीण आ. मू. 109 / 2023 कलम 174 सीआरपीसी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जनसंपर्क अधिकारी 

पोलीस अधिक्षक कार्यालय,नांदेड

Comments