नांदेड जिल्ह्यातील विमानतळ,सिंदखेड,मुखेड,नायगाव,अर्धापुर पोलीस स्टेशन अंतर्गत खुनाचा प्रयत्न,जीप चोरी,विवाहितेचा छळ,खंडणी,प्रोव्हिबीशन इत्यादी सहा गुन्हे दाखल

 


प्रेसनोट

जा.क्रं. 324 / 2023 दिनांक 22.08.2023

पोलीस अधिक्षक कार्यालय,नांदेड

1) खुनाचा प्रयत्न :-

विमानतळ :- दिनांक 20.08.2023 रोजी चे 15.30 वा. चे सुमारास, आनंदनगर ते विद्युतनगर जाणारा रोड कंधारची खिचडी हॉटेल समोर नांदेड येथे, यातील नमुद दोन आरोपीतांनी संगणमत करून फिर्यादीस तुझे चुलत भावाने माझा मित्र सदाशिव देशमुख यास ठार मारले तेंव्हा तु तुझ्या चुलत भावास मदत का केलास असे म्हणुन शिवीगाळ करून यातील आरोपीने फिर्यादीचे मोटार सायकलला लाथ मारून खाली पाडुन दुसऱ्या आरोपीने दाबुन धरले व खजरने डोक्यात मारून गंभीर दुखापत करून खुन करण्याचा प्रयत्न केले. फिर्यादीचे मित्रास थापा बुक्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. वगैरे फिर्यादी शुभम राजुसिंह सूर्यवंशी, वय 23 वर्षे व्यवसाय शिक्षण रा. समर्थनगर नांदेड यांचे फिर्यादीवरून पोस्टे विमानतळ गुरन 291 / 2023 कलम 307, 326, 324, 323, 504, 506, 34 भादवि सह कलम 4 / 25 माहका कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

2) जिप चोरी :-

1)सिंदखेड :- दिनांक 19.08.2023 रोजी चे 02.45 वा. चे सुमारास, वाई बाजार येथील कॉम्पलैक्स जवळुन ता. माहुर जि. नांदेड येथे यातील फिर्यादीची बोलेरो पिकअप कंपणीची जिप क्रमांक एमएच - 30 / एबी-3979 किमती 4,00,000/- रूपयाची ही सचिन शेषेराव राठोड, रा. वसराम तांडा यांचे वाई बाजार येथील कॉन्पलेक्स जवळून कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली वगैरे फिर्यादी आकाश सुरेश राऊत, वय 25 वर्षे, व्यवसाय गुत्तेदार रा. येनोरा पोस्ट चिंचोली ता. हिंगणघाट जि. वर्धा यांनी दिलेल्या फिर्यादवरून पोस्टे सिंदखेड गुरनं 85 / 2023 कलम 379 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

3) विवाहीतेचा छळ :-

मुखेड :- दिनांक 02.03.2008 च्या नंतर तीन वर्षांपासुन ते आज पावेतो, फिर्यादीचे सासरी मौ. मंग्याळ ता. मुखेड जि.नांदेड येथे, यातील नमुद सात आरोपीतांनी संगणमत करून फिर्यादी बाईस ट्रॅक्टरचे हप्ते भरण्यासाठी एक लाख रूपये तुझे माहेरहून घेवुन ये नाहीतर तुला घरात राहुदेत नाही असे म्हणुन मारहाण करून उपाशी पोटी ठेवुन शिवीगाळ व मारहाण करून शारिरीक व माणसीक छळ केला. व जिवे मारण्याची धमकी दिली. वगैरे फिर्यादी 31 वर्षीय महिला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोस्टे मुखेड गुरनं 242 / 2023 कलम 498 (अ) 323, 504, 506, 34 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

4) खंडणी :-

नायगांव :- दिनांक 12.08.2023 रोजी चे 13.30 ते 14.30 वा. चे दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय समोर रोडवर नायगाव ता. नायगाव जि. नांदेड येथे, यातील नमुद आरोपीने फिर्यादीचे मी. सुजलेगाव येथील जमिनीवर मा.तहसीलदार नायगाव यांनी आरोपीने दिलेल्या तक्रारी अर्जावरून बोजा चढविला असुन तो बोजा काढुन घेण्याकरीता दोन लाख रूपयाची खंडणीची मागणी केली. जर मला दोन लाख रूपये खंडणी नाही दिले तर तुझी जमीन जप्त करायला लावतो व तुला जेलमध्ये टाकायला लागतो असे म्हणुन खंडणीची मागणी केली. वगैरे फिर्यादी सुभाष गंगाराम नव्हारे वय 49 वर्षे, रा. सुजलेगाव ता. नायगांव जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे नायगांव गुरनं 125/2023 कलम 395,भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

5) प्रोव्हिबीशन :-

1) मुखेड :- दिनांक 21.08.2023 रोजी थे 13.30 वा. चे सुमारास, नरसी ते मुखेड जाणारे रोडवर तडका धाब्यामध्ये ता.मुखेड जि. नांदेड येथे, यातील नमुद आरोपीने बिना परवाना बेकायदेशिररित्या विदेशी दारू किंमती 2250 /- रुपयाचा मुद्येमाल चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने ताब्यात बाळगलेला मिळुन आला. वगैरे फिर्यादी पोउपनि / श्री गोविंद संभाजी मुंडे,ने. स्थागुशा यांनी दिलेल्या फिर्यादवरून पोस्टे मुखेड गुरनं 243 / 2023 कलम 65 (ई). न. प्रो. कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

2) अर्धापुर :- दिनांक 21.082023 रोजी थे 11.00 वा. वे सुमारास, पेट्रोलपंपाचे बाजुस विजय धान्याच्या पाठीमागे मोकळया जागेत पिंपळगाव शिवार ता. अर्धापुर जि. नांदेड येथे यातील नमुद आरोपीने बिना परवाना बेकायदेशिररित्या देशी दारू किंमती 1200 /- रुपयाचा मुधेमाल चोरटी विक्री करण्याचे संदेशाने ताब्यात बाळगलेला मिळून आला वगैरे फिर्यादी पोहेकॉ / 2470 कल्याण रत्नाकर पांडे ने पोस्टे अर्थापुर यानी दिलेल्या फिर्यावरून पोस्टे अर्धापुर गुरन 312 / 2023 कलम 65 (ई). म. प्रो. कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जनसंपर्क अधिकारी

पोलीस अधिक्षक कार्यालय,नांदेड 

Comments

Popular posts from this blog

नांदेड जिल्ह्यातील किनवट,सोनखेड,नायगाव,हदगाव,भोकर,नांदेड ग्रामीण,देगलूर,अर्धापुर,उमरी पोलीस स्टेशन अंतर्गत जबरी चोरी,जनावर चोरी, गंभीर दुखापत,विवाहीतेचा छळ,आत्महत्येस प्रवृत्त केले,जुगार,प्रोव्हिबीशन,भारतीय हत्यार कायदा,नवीन पुलावरून गोदावरी पात्रात उडी मारुन आत्महत्या,गळफास घेऊन आत्महत्या इत्यादी १६ गुन्हे दाखल