खुनाचा प्रयत्न-वजिराबाद; घरफोडी-उस्माननगर,बिलोली,लोहा, अर्धापूर; वाहनचोरी-धर्माबाद,तामसा; अवैध रेती चोरी-देगलूर; गंभीर दुखापत-सिंदखेड; अमली पदार्थ-भोकर; भारतीय हत्यार कायदा-नांदेड ग्रामीण; जुगार -रामतिर्थ,देगलूर; प्रोव्हिबीशन -धर्माबाद,रामतिर्थ इत्यादी १५ गुन्हे दाखल
नांदेड/संपादक संजय पाटील चिखले
प्रेसनोट
जा.क्रं. 328/2023 दिनांक : 26.08.2023
पोलीस अधिक्षक कार्यालय, नांदेड
1) खुनाचा प्रयत्न :-
वजिराबाद :- दिनांक 24.08.2023 रोजी 21.00 वा. ते 21.30 वा. चे दरम्यान, नगीनाघाट नदीपात्राच्या पायऱ्यावर, नांदेड येथे, यातील अज्ञात चार आरोपीतांनी संगणमत करून फिर्यादी हा नगीनाघाट नदीपात्राच्या पायऱ्यावर बसला असता आरोपीतांनी तु येथे बसु नको असे म्हणुन फिर्यादी सोबत वाद घालुन शिवीगाळ करून आरोपीतांनी फिर्यादीस लाठीने तलवारीने हातावर मारून बोट तोडले व गंभीर जखमी करून खुन करण्याचा प्रयत्न केला वगैरे फिर्यादी गुविंदरसिंह गुर्बक्षसिंह अलग, वय 54 वर्षे, व्यवसाय खाजगी नौकरी रा. क्लासी टावर विंग, डॉ. नेर रोड आग्रीपाडा, मुंबई यांचे फिर्यादवरुन पोस्टे वजिराबाद गुरन 366 / 2023 कलम 307,504,34, भादवि सह कलम 4 / 25 भाहका कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास चालू आहे
2) घरफोडी :-
1) उस्माननगर :- दिनांक 24.08.2023 रोजी 12.00 वा. ले 15.00 वा. चे दरम्यान, मौजे साळवेश्वर नवी आबादी दत्तमंदीर जवळ ता. कंधार जि. नांदेड येथे, यातील फिर्यादी हा कामनिमीत्त शेतात गेला असता त्यांचे घराचे कंपाउंडचे वरून आत प्रवेश करून बेडरूम मध्ये ठेवलेल्या लोखंडी कपाटाचे दार तोडून कपाटाचे कपाटाचे लॉकर मध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने एकुण किंमती 69636 /- रूपयाचा ऐवज कोणीतरी अज्ञात चोरटयांनी चोरून नेला वगैरे फिर्यादी नामदेव मारोती कदम, वय 55 वर्षे, व्यवसाय शेती रा. सावळेश्वर ता. कंधार जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरून पोस्टे उस्माननगर गुरनं 123/ 2023 कलम 454,380 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास चालू आहे.
2) बिलोली दिनांक 22.08.2023 रोजी वेळ नक्की नाही, छोटी गल्ली, बिलोली ता. बिलोली जि. नांदेड येथे, यातील फिर्यादी हा त्याचे घराला कुलूप लावून दोन महिन्यापुर्वी कामासाठी पुणे येथे गेला असता फिर्यादीचे घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून घरातील सोन्याचे दागिने एकुण किंमती 61000/-रूपयाचा ऐवज कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला वगैरे फिर्यादी मारोती मोहन गोरठेकर, वय 40 वर्षे, व्यवसाय मजुरी रा. छोटी गल्ली बिलोली ता. बिलोली जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे बिलोली गुरनं 159 / 2023 कलम 457380 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास चालू आहे.
3) लोहा :- दिनांक 25.08.2023 रोजी 13.30 वा. ते 17.00 वा चे दरम्यान, फिर्यादीचे राहते घरी संगुचीवाडी ता. कंधार जि. नांदेड येथे, यातील फिर्यादीचे घराचा मुख्य दरवाजा बंद असताना घरालगतच्या झाडावर चढून घरात आत प्रवेश करून गॅसचे टाकी खाली ठेवलेले नगदी व सोन्याचे दागिने एकूण किमती 2,85,400 /- रूपयाचा ऐवज कोणीतरी अज्ञात चोरटयानी चोरून नेला वगैरे फिर्यादी सखाराम ज्ञानोबा वारकड, वय 40 वर्षे, व्यवसाय व्यापार रा. संगुचीवाडी ता. कंधार जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे लोहा गुरनं 210 / 2023 कलम 454380 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास चालू आहे.
4 ) अर्धापूर :- दिनांक 24.082023 रोजी 1900 वा. ते दिनांक 25.082023 रोजी चे दरम्यान, बारसगाव शिवारातील शेत गट नं. 266 मधील बारसगाव ता. अर्धापूर जि. नांदेड येथे, यातील फिर्यादीचे शेतातील शेडमध्ये ठेवलेली सब मशीन बल पाण्याची मोटार वरूना कंपनीची व केबल वायर असा एकुण 50,100 /- रूपयाचा माल शेड चे कुलूप तोडून आत प्रवेश करून कोणीतरी अज्ञात चोरटयांनी चोरून नेले. वगैरे फिर्यादी मुंजाजी रामचंद्र बारसे, वय 28 वर्षे, व्यवसाय शेती रा. बारसगाव ता. अर्धापूर जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरून पोस्टे अर्धापूर गुरनं 323 / 2023 कलम 457, 380 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास चालू आहे.
3) वाहन चोरी :-
1) धर्माबाद :- दिनांक 22.08.2023 रोजी 19.00 वा. ते दिनांक 23.08.2023 रोजी 10.30 वा. चे दरम्यान, ताज भुसारच्या दुकानाचे पाठीमागे मोकळ्या जागेत ता. धर्माबाद जि. नांदेड येथे, यातील फिर्यादीची महिंद्रा बोलेरो पिकअप मालवाहु पांढऱ्या रंगाची क्रमांक एमएच-04 / जीसी - 9993 किंमती 1,25,000 /- रूपयाची नमुद ठिकाणावरून कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली वगैरे फिर्यादी अझरूद्दीन शाहिद अहमद, वय 35 वर्षे, व्यवसाय व्यापार रा. पटेलनगर देवी गल्ली धर्माबाद ता. धर्माबाद जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे धर्माबाद गुरन 219 / 2023 कलम 379 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास चालू आहे.
2) तामसा :- दिनांक 22.08.2023 रोजी 23.00 वा. चे सुमारास मौजे आष्टी ता. हदगाव जि. नांदेड येथे, यातील फिर्यादीचा ट्रॅक्टर क्रमांक एमएच-26 / बीजी- 0541 किंमती 5,00,000/- रूपयाचा नमुद ठिकाणावरून कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेला. वगैरे फिर्यादी गोपाल पंजाबराव कदम, वय 27 वर्षे, व्यवसाय शेती रा. आष्टी ता. हदगाव जि.नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे तामसा गुरनं 81 / 2023 कलम 379 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन
तपास चालू आहे.
4) अवैध रेती चोरी :-
देगलूर :- दिनांक 25.08.2023 रोजी 07.25 वा. चे सुमारास, आरटीओ चेक पोस्ट समोर रोडवर देगलूर ता. देगलूर जि.नांदेड येथे, यातील नमुद चार आरोपीतांनी स्वतःचे फायदयासाठी एक हिरव्या रंगाचा ड्युस फायर कंपनीचा ट्रॅक्टर क्र. एम.एच-26 / बीक्यु-0685 महिंद्रा व अर्जुन 555 लाल रंगाचा ट्रॅक्टर क्रं एम.एच-26 / बीएक्स 9873 असे एकुण किंमती 1,00,000 /- रूपयाचे मध्ये दोन ब्रास रेती एकुण किमती 8,000 /- रूपयाची विनापरवाना बेकायदेशीर रित्या चोरून घेवून जात असताना मिळून आले वगैरे फिर्यादी ज्ञानेश्वर गोविंदराव रातोळीकर, वय 41 वर्षे, व्यवसाय नौकरी तलाठी सज्जा देगलूर ता. देगलूर जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे देगलूर गुरनं 391 / 2023 कलम 379,34 भादवी सह कलम 48 (7) (8) जमीन महसूल अधिनियम 1966 कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास चालू आहे.
5) गंभीर दुखापत :-
सिंदखेड :- दिनांक 22.08.2023 रोजी 08.00 वा. चे सुमारास, मौजे आष्टा येथील ग्रा.पं. कार्यालय ता. माहुर जि. नांदेड येथे, यातील फिर्यादी व त्याची पत्नी, मुलगा, सुन यांना यातील नमुद 14 आरोपीतांनी जुन्या भांडणाचे कारणावरून गैरकायदयाची मंडळी जमवून रॉड, पंच, खुर्चिने, लाथा बुक्यांनी डोक्यात, मानेवर मारहाण करून गंभीर दुखापत केली व अश्लिल शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली वगैरे फिर्यादी सुभद्राबाई बळीराम राठोड, वय 51 वर्षे, व्यवसाय घरकाम रा. आष्टातांडा ता. माहुर जि. नांदेड यांचे फिर्यादवरुन पोस्टे सिंदखेड गुरन 88 / 2023 कलम 326,324, 323, 294,143,148,149,504,506 भादवि कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास चालू आहे.
6) अंमली पदार्थ :-
भोकर :- दिनांक 25.08.2023 रोजी 08.45 वा. चे सुमारास, डोंगरे टी पॉईंट समोर भोकर ता. भोकर जि. नांदेड येथे,यातील नमुद दोन आरोपीतानी बिना परवाना बेकायदेशिररित्या आपले वाहन क्र. टी. एस. 36/ टी-4202 किमती 3,00,000 /- रूपयाचे मध्ये गांजा सारखा अंमली पदार्थ 52 किलो 500 ग्रॅम एकुण किमती 5,25,000 /- रूपयाचा स्वतःच्या फायदयासाठी चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने ताब्यात बाळगलेले मिळुन आले वगैरे फिर्यादी पोनि / श्री नानासाहेब ज्ञानदेव उबाळे, ने. पोस्टे भोकर यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे भोकर गुरनं 308/2023 कलम 8(क) (2) (क). 20 (ब) एनडीपीएस अधिनियम 1985 कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास चालू आहे.
7) भारतीय हत्यार कायदा :-
नांदेड ग्रामीण :- दिनांक 25.08.2023 रोजी 14.45 वा चे सुमारास, पुजा हॉटेल समोर लातुर फाटा, नांदेड येथे,यातील नमुद चार आरोपीतांनी बिना परवाना बेकादेशीररीत्या आपले ताब्यात गावठी बनावटीची पिस्टल व चार जिवंत काडतुस एकूण किंमती 27,400 /- रूपयाचे स्वतःचे ताब्यात बाळगलेले मिळुन आले वगैरे फिर्यादी सपोनि / श्री रवी वैजनाथराव वाहुळे, ने. स्थागुशा, नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरून पोस्टे नांदेड ग्रामीण गुरनं 626 / 2023 कलम 3/25,7 / 25, भारतीय हत्यार कायदा सह कलम 135 मपोका प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास चालू आहे.
8) जुगार :-
1) रामतीर्थ :- दिनांक 25.08.2023 रोजी 15.30 वा. चे सुमारास, मौजे चिटमोगरा येथे पाण्याच्या टाकी जवळ पठाण शब्बीर यांचे गोठया समोर मोकळ्या जागेत ता. बिलोली जि. नांदेड येथे यातील नमुद तीन आरोपीतांनी मिळुन बिना परवाना बेकायदेशिररित्या पत्यावर तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवित असताना नगदी 3580/- रुपये व जुगाराचे साहित्यासह मिळुन आले वगैरे फिर्यादी पोकों / 485 अनिल बालाजी रिंदकवाले ने पोस्टे रामतीर्थ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोस्टे रामतीर्थ गुरनं 136 / 2023 कलम 12 (अ) म. जु. कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास चालू आहे.
2) देगलूर :- दिनांक 25.08.2023 रोजी 14.15 वा चे सुमारास मोंढा देगलूर ता. देगलूर जि. नांदेड येथे, यातील नमुद आरोपीने बिना परवाना बेकायदेशिररित्या कल्याण नावाचा मटका जुगार खेळत व खेळवित असतांना नगदी 2870 /- रुपये व जुगाराचे साहित्यासह मिळुन आला वगैरे फिर्यादी सपोउपनि / श्री संजय विश्वनाथ केंद्रे, ने. स्थागुशा, नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरून पोस्टे देगलूर गुरनं 393 / 2023 कलम 12 (अ) म. जु कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास चालू आहे.
9) प्रोव्हिबीशन :-
1) धर्माबाद :- दिनांक 25.08.2023 रोजी 17.00 वा. चे सुमारास आरोपीचे शेतातील टिनपत्राचे आखाडयामध्ये बाभूळगाव ता. धर्माबाद जि. नांदेड येथे, यातील नमुद आरोपीने बिना परवाना बेकायदेशिररित्या देशी दारू भिंगरी संत्रा किमती 3360/- रुपयाचा मुद्देमाल चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने ताब्यात बाळगलेला मिळुन आला. वगैरे फिर्यादी सपोनि / श्री बालाजी गोविंदराव महाजन ने पोस्टे धर्माबाद यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे धर्माबाद गुरन 222 / 2023 कलम 65 (ई), म प्रो. कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास चालू आहे.
2) रामतीर्थ :-- दिनांक 25.08.2023 रोजी 18.00 वा. चे सुमारास, मौजे कोल्हे बोरगाव आरोपीचे राहते झोपडीच्या बाजुस ता. बिलोली जि. नांदेड येथे यातील नमुद आरोपीने बिना परवाना बेकायदेशिररित्या शिंदी किमती 2750 /- रुपयाचा मुद्देमाल चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने ताब्यात बाळगलेला मिळुन आला. वगैरे फिर्यादी सपोउपनि / श्री मारोती नारायण तेलंगे, ने. स्थागुशा, नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरून पोस्टे रामतीर्थ गुरन 137 / 2023 कलम 65 (ई), म. प्रो. कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास चालू आहे.
जनसंपर्क अधिकारी
पोलीस अधिक्षक कार्यालय,नांदेड

Comments
Post a Comment