नांदेड जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत घरातील चोरी करण्याचा प्रयत्न-मरखेल; चोरी-शिवाजीनगर,सोनखेड ; गंभीर दुखापत-नांदेड ग्रामीण,वजिराबाद; विवाहितेचा छळ-इस्लापूर; भारतीय हत्यार कायदा-शिवाजीनगर,रामतिर्थ; जुगार-अर्धापूर,देगलूर; प्रोव्हिबीशन-मुदखेड,भाग्यनगर; गळफास घेऊन शेतकरी आत्महत्या-लिंबगाव इत्यादी १३ गुन्हे दाखल
दिनांक : 27.08.2023
पोलीस अधिक्षक कार्यालय, नांदेड जा.क्र. 329/2023
1) घरातील चोरी करण्याचा प्रयत्न :-
मरखेल :- दिनांक 26.082023 रोजी चे 02.00 वा चे सुमारास, फिर्यादीचे घरी मौजे लोणी ता. देगलुर जि. नांदेड येथे. यातील आरोपीतानी संगणमत करून फिर्यादीचे घराचे मुख्य दाराच्या पूर्व कढील मोकळ्या जागेततुन प्रवेश करून आतील दाराचे कुलूप व कपाटाचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न करीत असताना मिळुन आले वगैरे फिर्यादी जयप्रकाश मारोतीराव जाधव, वय 38 वर्षे, व्यवसाय शेती रा. लोणी ता. देगलुर जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोस्ट मरखेल गुरन 171 / 2023 कलम 454, 3051134 भाती कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास चालू आहे.
2) चोरी :-
1) शिवाजीनगर :- दिनांक 25.082023 रोजी 21.00 था. चे सुमारास, बिसेननगर नांदेड येथे, यातील फिर्यादीची हिरोहोंडा शाईन कंपनीची मोसा क्रमांक एमएच-26-एएम 5373 घरा समोर लावलेल्या ठिकाणा वरून किंमती 45,000/- रूपयाची कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. वगैरे फिर्यादी चंद्रप्रकाश बालाप्रसाद तोस्निवाल, वय 55 वर्षे, व्यवसाय नौकरी रा. बिसेननगर नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरून पोस्टे शिवाजीनगर गुरनं 284 / 2023 कलम 379, भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास चालू आहे.
2) सोनखेड :- दिनांक 20.08.2023 रोजी 01.00 ते 06.00 वा. चे दरम्यान सार्वजनिक रोडवर हॉटेल समोर सोनखेड नांदेड येथे, यातील फिर्यादीची हिरोहोंडा शाईन कंपनीची मोसा क्रमांक एमएच-26- बिएच 5008 ही बसस्थानक सोनखेड येथे लावलेल्या ठिकाणा वरून हॅन्डल लॉक तोडुन किंमती 60,000 /- रुपयाची कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली. वगैरे फिर्यादी केरवा बालाजी तोटेवाड, वय 55 वर्षे, व्यवसाय मंगल सांगवी ता. कंधार जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे सोनखेड गुरनं 113/ 2023 कलम 379, भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास चालू आहे.
3) गंभीर दुखापत :-
1) नांदेड ग्रामीण : दिनांक 25.08.2023 रोजी चे 09.00 वा. चे सुमारास, इकबालनगर नांदेड येथे, यातील नमुद तीन आरोपीतांनी संगणमत करून फिर्यादीस सुरमा व मिश्री उधार देण्याचे कारणावरून फिर्यादीस बुक्कीने तिचे डावे गालावर मारून दात पाडला व फिर्यादीचे सुनेस शिवीगाळ करून थापडाने व लाथाने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली वगैरे फिर्यादी नजमुनीसा बेगम अब्दुल हमीद, वय 60 वर्षे, व्यवसाय घरकाम व सुरमा विक्री रा. इकबालनगर नांदेड यांचे फिर्यादवरुन पोस्टे नांदेड ग्रामीण गुरन 628 / 2023 कलम 325, 323, 504, 506, 34 भादवि कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास चालू आहे.
2) वजिराबाद :- दिनांक 25.08.2023 रोजी चे 02.30 वा. चे सुमारास, गुरूदवारा गेट नं 06 नांदेड येथे, यातील फिर्यादी यांचे गुरूदवारा गेट नं 06 येथील लाईट बसवण्याचे कारणावरून यातील आरोपीने फिर्यादी सोबत वाद घालुन शिवीगाळ करून त्यांच्या हातातील खंजराने फिर्यादीस खंजरने डोक्यात व डावे डोळयाचे वर मारून गंभीर दुखापत केली आहे. वगैरे फिर्यादी सत्यजीत स्वरूपजिवन जैस्वाल, वय 47 वर्षे, व्यवसाय गुतेदर रा. विष्णुनगर नांदेड यांचे फिर्यादवरून पोस्टे वजिराबाद गुरन 367 / 2022 कलम 326, 504 भादवि कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास चालू आहे.
4) विवाहीतेचा छळ :-
इस्लापुर :- दिनांक 22.04.2021 ते आज पावेतो, मौ. बोघडी खुर्द इस्लापुर ता. किनवट जि. नांदेड येथे, यातील नमुद चार आरोपीतांनी संगणमत करून फिर्यादी बाईस तु वांझोटी आहेस म्हणुन चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ व थापड बुक्याने मारहाण करून शारिरीक व माणसीक छळ केला. वगैरे फिर्यादी 22 वर्षीय महिला यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे इस्लापुर गुरनं 83/ 2023 कलम 498 (अ), 323, 34 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास चालू आहे.
(5) भारतीय हत्यार कायदा :-
1) शिवाजीनगर:- दिनांक 26.082023 रोजी 15.45 वा वे सुमारास विसावा उध्यान समोर सर्वजनिक रोडवर नांदेड येथे यातील नमुद आरोपीने बिना परवाना बेकादेशीररीत्या आपले ताब्यात एक खजर किंमती 500/- रूपयाची बाळगलेले फिर्यादी पोउपनि / श्री मिलींद मधुकर सोनकांबळे, ने पोस्टे शिवाजीनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोस्टे शिजीनगर गुरन 286 / 2023 कलम 4/25. भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास चालू आहे.
(2) रामतीर्थ :-- दिनांक 26.08.2023 रोजी 00.30 वा. चे सुमारास नर्सी ते देगलुर रोडवर बालाजी मंदिर समोर नर्सी ता. नायगाव नांदेड येथे यातील नमुद दोन आरोपीतानी बिना परवाना बेकादेशीररीत्या आपले ताब्यात हिरो होंडा कंपणीची मो एमएच-26 / सिविझेड -9712 किंमती 35,000/- रूपयाची व एक लोखंडी खंजर, एक तलवार किमती 3500/-रूपयाचे बाळगलेले मिळुन आले. वगैरे फिर्यादी पोकों / अनिल बालाजी रिंदकवाले ने पोस्टे रामतिर्थ यांनी दिलेल्या फिर्यादवरून पोस्टे रामतिर्थ गुरन 138 / 2023 कलम 4/25, भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास चालू आहे.
6) जुगार :-
1) अर्धापुर :- दिनांक 26.08.2023 रोजी 13.30 वा. चे सुमारास, मालेगाव ते अर्धापुर जाणारे रोडचे लगत मालेगाव ता. अर्धापुर जि.नांदेड येथे यातील नमुद चार आरोपीतांनी मिळुन बिना परवाना बेकायदेशिररित्या कल्याण ओपन व मिलन ओपन नावाचा जुगार खेळत व खेळवित असताना नगदी 14,690 /- रुपये व जुगाराचे साहित्यासह मिळुन आले. वगैरे फिर्यादी पोहेकॉ / 652 अर्जुन दत्तराव शिंदे ने स्थागुशा नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरून पोस्टे अर्धापुर गुरनं 326 / 2023 कलम 12 (अ) म जु. कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास चालू आहे.
2) देगलुर :- दिनांक 26.08.2023 रोजी 15.30 वा. चे सुमारास खानापुर फाटा येथे कृष्णा हॉटेलचे बाजुस खानपुर ता. देगलुर जि.नांदेड येथे, यातील आरोपीने बिना परवाना बेकायदेशिररित्या मिलन डे नावाचा जुगार खेळत व खेळवित असताना नगदी 1750/- रुपये व जुगाराचे साहित्यासह मिळुन आले वगैरे फिर्यादी पोउपनि / श्री. श्रीकांत माधवराव मोरे ने पोस्टे देगलुर नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे देगलुर गुरन 395 / 2023 कलम 12 (अ) म. जु कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास चालू आहे.
7) प्रोव्हिबीशन :-
1) मुदखेड :- दिनांक 26.08.2023 रोजी 13.15 वा. चे सुमारास, महाटि गाव नदीचे पुलाजवळ ता. मुदखेड जि. नांदेड येथे यातील नमुद आरोपीने बिना परवाना बेकायदेशिररित्या विदेशी दारू मॅकडॉल, रायल चैलेंज रायल स्ट्रॉग किंमती 4155/- रुपयाचा मुद्देमाल चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने ताब्यात बाळगलेला मिळुन आला. वगैरे फिर्यादी पोहेकॉ / गंगाधर विठ्ठलराव कदम, ने. स्थागुशा नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरून पोस्टे मुदखेड गुरनं 180 / 2023 कलम 65 (ई). म. प्रो. कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास चालू आहे.
2 ) भाग्यनगर :- दिनांक 26.08.2023 रोजी 13.10 वा. चे सुमारास कॅनलरोडवर भाग्यनगर नांदेड येथे यातील नमुद :- आरोपीने बिना परवाना बेकायदेशिररित्या देशी दारू भिंगरी संत्रा किंमती 3080 / - रुपयाचा मुद्देमाल चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने ताब्यात बाळगलेला मिळुन आला. वगैरे फिर्यादी पोकों / 3114 मारोती दत्ताराम मोरे ने स्थागुशा नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे भाग्यनगर गुरनं 339 / 2023 कलम 65 (ई) म. प्रो. कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास चालू आहे.
8) गळफास घेवुन शेतकरी आत्महत्या :-
लिंबगाव :- दिनांक 26.08.2023 रोजी थे 10.30 चे सुमारास, मयताचे शेतात ढोकी शिवारात लिंबगाव जि. नांदेड येथे, यातील मयत नामे गजानन चांदोजी डाखोरे, वय 40 वर्षे, व्यवसाय शेती रा. ढोकी ता.जि. नांदेड यानी शेतातील सततचे नापीकीस व बँकेचे कर्जास कंटाळुन मानसिक तणावात येऊन लिंबाचे झाडाला गळफास लावुन आत्महत्या केला. वगैरे खबर देणार संभाजी बालाजी डाखोरे, वय 40 वर्षे, रा. ढोकी ता. जि. नांदेड यांनी दिलेल्या खबरीवरुन पोस्टे लिंबगाव आ. मृ. 10/2023 कलम 174 सीआरपीसी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास चालू आहे.
जनसंपर्क अधिकारी
पोलीस अधिक्षक कार्यालय,नांदेड

Comments
Post a Comment